शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
गोंदिया दि.९ डिसेंबर २०२४
दि. ०८ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया चे पोलीस पथक हे गोंदिया जिल्ह्यातून विविध पोलीस ठाणेस दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा व चोरीच्या मोटार सायकल चा शोध घेत असताना. पथकास गोपनीय बातमीदार यांचेकडून माहिती मिळाली की, इसम नामे यश गुप्ता राह. मामा चौक गोंदिया यांचेकडे चोरीच्या मोटार सायकली असून विक्री करणार आहे.अश्या मिळालेल्या माहितीच्या आधारे-मोटार सायकल चोरी करून विक्री करणारा गुन्हेगार नामे-
१) यश रमेश गुप्ता वय- २० वर्ष, रा. मामा चौक गोंदिया यास त्यांचेकडे असलेल्या चोरीच्या मोटार सायकल सह ताब्यात घेण्यात आले.त्यास त्याचे ताब्यात असलेल्या चोरीच्या मोटार सायकल बाबत सखोल चौकशी विचारपूस केली असता त्यांनी
२) लोकेश मानिकचंद रिनाईत वय-२१ वर्ष रा. खापर्डे कॉलोनी गोंदिया,
३) राहुल उर्फ चंगा सुपचंद लिल्हारे वय २३ वर्ष, रा. अंगुर बगीचा गोंदिया
यांनी मो. सा. करून विक्री करीता आणून दिल्याचे सांगितल्याने आरोपी क्रं २ व ३ यांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले..
तिघांनाही जिल्ह्यातील विविध पो. ठाण्यास दाखल चोरीच्या गुन्ह्यातील मोटार सायकल संबंधात सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपी क्रं 1 व 2, 3 यांनी पो.ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून मोटार सायकल चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपीतांचे ताब्यातून गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर येथील दाखल गुन्ह्यातील तसेच जिल्हा भंडारा व नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण ११ नग चोरीच्या मोटर सायकली किमती ८ लक्ष ३५००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे.आरोपी व गुन्ह्यात जप्त चोरीच्या ११ मो. सा. मुद्देमाल पो. ठाणे रामनगर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले असून रामनगर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो. हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, चापोशी राम खंदारे, मुरली पांडे यांनी केलेली आहे.