उद्यापासून साखरीटोला येथे तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात

Shabd Sandesh
0

🔷 कार्यक्रमाची जय्यत तय्यारी 
 शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
साखरीटोला, दि.१८

   गोंदिया जिल्हा परिषदेने अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून सालेकसा तालुक्याचे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन साखरीटोला येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम 19 डिसेंबर पासून ते 22 डिसेंबर पर्यंत चार दिवस जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीत पटागंणावर होणार आहे. गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन क्षेत्राचे आमदार संजयभाऊ पुराम यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाची अध्यक्षता प.स. सभापती सौ. प्रमिलाताई गणवीर करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई काळे, विमलताई कटरे, छायाताई नागपुरे, गीताताई लिल्हारे, उपसभापती संतोषभाऊ बोहरे व गणमान्य नागरिक उपस्थित राहतील. केंद्रस्तरीय स्पर्धेतुन यशस्वी झालेले अनेक प्रतिभावंत खेळाडू तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणार आहेत. कार्यक्रमादरम्यान कबड्डी, खो-खो, नाटिका, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, प्रेक्षनीय कवायत, असे विविध संस्कृतीक स्पर्धात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. सालेकसा तालुक्यातील रामाटोला, सालेकसा, कोटरा, सोनपुरी, तिरखेडी, झालिया, रोंढा, बीजेपार, साकरीटोला, दर्रेकसा, या 10  केंद्रातील माध्यमिक व प्राथमिक शाळा भाग घेणार आहेत.  साखरीटोलावासियांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आले आहे. साकरीटोला येथे जि.प. शाळेच्या पटागंणावर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सातगावचे सरपंच नरेश कावरे, उपसरपंच सौ.श्वेता अग्रवाल ग्रा.प. सदस्य सौ. अफरोज पठाण, वसंत साखरे, अजय उमाटे, गौरव कोडापे, सुनीता चकोले, सुमन ठाकरे, सुषमा काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराम चुटे, उपाध्यक्ष सौ. शोभा मेश्राम, माया चुटे, पायल सोनटक्के, तारा कपाट, सपना भांडारकर, मनीषा चुटे, सीमा टेभूर्णिकर, श्री छत्रपती कटरे, याशीमखान पठाण, ओमप्रकाश लांजेवार, किशोर क्षीरसागर, फिरोज शेख, सातगाव समितीचे अध्यक्ष प्रकाश राऊत, उपाध्यक्ष भूमेश्वर वाघाडे, अरविंद राऊत, कैलास चन्ने, सौ कविता जगणे कविता खरवडे, छाया बहेकार, वंदना वाघाडे, मैत्रीण मोहबे, सुषमा काळे, विनोद मोहबे, जी. बी. टेभरे, सातगाव ग्रा.प. चे माजी उपसरपंच पुर्थ्वीराज शिवणकर, साखरीटोला केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका गावकरी परिश्रम घेत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)