ग्रामीण महिला मजूर फायनान्स च्या जाळ्यात

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.१६ डिसेंबर २०२४

     ग्रामीण भागातील महिला मजुरांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या छोट्या वित्तीय संस्था मागील दहा ते बारा वर्षापासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलामजुर या मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकले आहेत. दर आठवड्याला लाखो रुपयाची उलाढाल होत असून, अनेक महिला कर्जबाजारी होत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन आठ दहा महिलांचा गट बनवून सुरुवातीला प्रति महिला तीस हजार रुपयाचे कर्ज देतात. नंतर गटाच्या सिबिल स्कोर चांगला असल्यास कर्जाची रक्कम वाढवले जाते.या कर्जाची परतफेड दर आठवड्याला करावी लागते.आठवड्याच्या ठराविक दिवशी मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी एका विशिष्ट ठिकाणी बसून कर्जाची वसुली करतात. 
   ग्रामीण भागातील मजूर महिलांना नियमित मजुरी मिळत नाही. यामुळे संसार चालवताना आर्थिक अडचणी येतात. मायक्रो फायनान्स कंपनी कर्जाची एकदम रक्कम देत असून, थोड्या थोड्या रकमेने वसूल करते. परंतु,फायनल च्या हप्ता चुकविता येत नसल्याने, हप्ता भरण्याकरिता काही महिलांची चांगली तारांबळ उडते. बरेचदा या महिलांना खाजगी सावकाराचे कर्ज काढून हप्ता भरावा लागतो. त्यामुळे एका कर्जावर दोनदा व्याज भरण्याची ही वेळ महिलावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)