अल्पवयीन वाहन चालक सुसाट;वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
देवरी, दि.१५ डिसेंबर २०२४

ग्रामीण तसेच शहरातील रस्त्यावरून अल्पवयीन मुले  सुसाट वाहने चालवीत असल्यामुळे,लहान मोठे अपघात घडत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. 
   नागपूर रायपुर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा सुसाट सुरू असतो. मोठी वाहने भरधाव वेगाने चालक चालवीत असतात. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे.शिवाय अनेक लहान मोठे अपघात होत असल्याने, राष्ट्रीय महामार्गावर कधी कधी वाहनाच्या रांगाच रांगा दिसत असतात.वाहने उभी असल्याने अनेकांना आपली वाहने तासंतास उभी करावी लागतात. काही सुसाट दुचाकी चालविणारे वाहन चालक ही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. शिवाय शाळा,महाविद्यालय परिसरात गस्त वाढविण्याची गरज आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या वाहनांची धूम सुरू आहे. अशा प्रकारच्या सायलेन्सर मधून मोठा आवाज येत असल्यामुळे, अन्न वाहन चालकाचे लक्ष विचलित होत आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे. शहरात ठिकठिकाणी अनेक वाहने अनेकदा मोठा आवाज करीत धावताना दिसून येतात. आपण सध्या आता आपल्या वाहनाचा आवाज फटाका सारखा येत असल्याने हृदय विकत असलेल्या रुग्णांवर त्याच्या परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक प्रशासनाने शहरातील नियमित ग्रस्त वाढवून ध्वनी प्रदूषण वाढविणाऱ्या वाहनावर कारवाई करावी. पथकांना वेगवेगळ्या चौकामध्ये तैनात करावे. तसेच वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)