बोरगांव/बा.येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन

Shabd Sandesh
0
एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प देवरी जिल्हा गोंदिया अंतर्गत..
    संदेश मेश्राम देवरी, दि.०६
      
        शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याचे शारीरिक विकास करण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व घडविण्यात मैदानी खेळाचे अत्यंतिक महत्त्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखविण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते. या स्पर्धेत भाग घेणारे संघ, त्याचे खेळाडू, उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्य पत्रक बनविले जाते.
याच उद्देशातून,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी जि. गोंदिया अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा दि. ७ डिसेंबर २०२४ ते दि. ९ डिसेंबर २०२४ पर्यंत एकलव्य मॉडल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल बोरगाव/बा. ता. देवरी जि. गोंदिया येथील क्रीडांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.
    या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा, सहउद्घाटक पंकज रहांगडाले अध्यक्ष जि.प. गोंदिया, विशेष अतिथी रवींद्र ठाकरे अप्पर आयुक्त नागपूर, प्रजीत नायर जिल्हाधिकारी गोंदिया, मुरुगानंथम एम. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया, गोरख भांबरे पोलीस अधीक्षक गोंदिया, नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया, राधिका ताई धरमगुडे जि.प. सदस्य गोंदिया,संदीप भाटिया जि.प.सदस्य गोंदिया, उषाताई शहारे जि.प.सदस्य गोंदिया, कल्पनाताई वालोदे जि.प. सदस्य गोंदिया, अंबिकाताई बंजार सभापती प.स.देवरी, प्रल्हाद सलामे सदस्य प.स.देवरी, संजू उईके नगराध्यक्ष देवरी,कल्पनाताई देशमुख सरपंच बोरगाव/बा, कविता गायकवाड उपविभागीय अधिकारी देवरी, अमिता पिल्लेवार सहआयुक्त,उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी, अमित रामटेके वरिष्ठ संबोधन अधिकारी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)