तीन दिवशीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हरदोली येथे संपन्न
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क,
देवरी, दि.१३ डिसेंबर २०२४
हरदोली ग्रामस्थांनी नियोजित नसताना आलेली संधी समजून कार्यक्रमाचा भार स्वीकारून 3ते 4दिवसात सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करून प्राप्त कालावधीत संपूर्ण तयारी आणि उत्तम व्यवस्था करत,भव्य आयोजनकेले, व गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी आयोजन करून अत्यंत शांततापूर्ण व आनंददायी पद्धतीने, खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पाडला.
अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या पार पडले
दिनांक 9,10, 11 डिसेंबर 2024 ला जि. प. वरिष्ठ प्राथ.शाळा हरदोलीच्या क्रीडांगणावर केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचा सुंदर सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक अनिलजी बिसेन उपसभापती, पं.स. देवरी, ध्वजारोहक श्रीकिसनजी हूकरे, दिपप्रज्वलक-सरपंच गोरेलालजी मलये, अध्यक्ष महेंद्रजी मोटघरे ग.शि.अधि.देवरी, शि.विस्तार अधिकारी एस जी वाघमारे शिवचरणजी खैरे, मा टी.एस. कटरे मुख्या. सुभाष हाय डोंगरगाव, उपसरपंच कौतुकाबाई बडोले, पो.पा. संगीताबाई डोंगरे, उत्तमजी बोंबार्डे तसेच इतर मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडला.
नियोजनाप्रमाणे वैयक्तिक स्पर्धा व सांघिक सामने प्रेक्षणीय कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित वेळेत शांततापूर्णरित्या व उत्साहवर्धक वातावरणात पार पडले.
बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी यशस्वी आयोजनाबद्दल गावकऱ्यांचे केले कौतुक
बक्षीस वितरक मा.सविताताई पुराम सभापती महिला व बालकल्याण गोंदिया, प्रमुख पाहुणे मा.लांडे सर उपशिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया, विश्वकर्मा मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी,जगतजी नेताम माजी पंचायत समिती सदस्य, केंद्रप्रमुख डी. टी.लाडे मुख्या.संदीप तिडके सर, मुख्या.जनबंधू सर.
क्रीडाप्रावीन्याचा सन्मान हरदोली शाळेला मिळाला.हरदोली शाळेला प्राथ. मुली कबड्डी प्रथम, प्राथ. मुली खो -खो प्रथम, माध्य. मुली खो-खो द्वितीय,प्राथ.मुले खो-खो द्वितीय, प्राथ. मुले कबड्डी द्वितीय वैयक्तिक स्पर्धा प्रेक्षणीय कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सुद्धा हरदोली येथील विद्यार्थी प्राविण्य प्राप्त केले.
गावकऱ्याकडून तीन दिवस दूध आणि बिस्कीटचे वाटप
शिवचरणजी चाकाटे, आणि तेजलालजी मेश्राम यांनी सर्व खेळाडू मुला-मुलींना आणि क्रीडा शिक्षकांना 3दिवस दूध आणि बिस्कीट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
गावकऱ्यांनी तीनही दिवस उत्तम भोजन व्यवस्था व शेवटच्या दिवशी गोड जेवण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती , शिक्षक पालक समिती ग्रामपंचायत कार्यालय,केंद्रातील सर्व शिक्षकवृंद,तंटामुक्ती समिती , नवयुवक क्रीडा मंडळ, महात्मा फुले विद्यालय येथील विद्यार्थी तसेच गावातील समस्त ग्रामस्थ यांचे शाळेचे मुख्या.भागवत भोयर यांनी आभार मानले. शाळेतील शिक्षकवृन्द श्री गजबे,श्री भोयर, श्री मदने, श्रीमती कवडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.