बोरगांव येथिल"ती" विहीर देतेय अपघाताला आमंत्रण

Shabd Sandesh
0
आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांचे दुर्लक्ष..
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
   देवरी, दि.०७

      देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायत अंतर्गत बोरगाव वार्ड क्र. १ येथील विहिरीचा मागील पंधरा ते वीस वर्षापासून गावकरी उपयोग करीत नसल्याने,या ठिकाणी पावसाळ्यात सांडपाणी जमा होऊन त्या ठिकाणी डासाची निर्मिती होत आहे त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, जि.प.शाळेच्या अगदी फाटके समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षापासून शाळेच्या आवारात स्थित असलेली जुनाट विहीर पूर्णतःजीर्ण झालेली असून धोकादायक असल्यामुळे, विहीर बुजविण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
    सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिलापुर अंतर्गत बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कित्येक वर्षापासून एक जुनी विहीर आहे.शाळेला स्वतःचा मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे, शाळेसमोरील खुल्या आवारामध्ये मुलं खेळ खेळत असतात. सदर विहीर पूर्णतःजीर्ण झालेली असून, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. विहिरलगत थोडासा मैदान असल्यामुळे,शाळेतील शिक्षक मुलांना खो-खो,कबड्डी तसेच इतर खेळ शिकवित असतात. फावल्या वेळामध्ये मुलेही त्याच ठिकाणी खेळ खेळत असल्यामुळे,त्यामुळे कधीही धोका निर्माण होऊ शकतो.
    त्याचप्रमाणे समाज भवनाची इमारत याच परिसरात असल्यामुळे गावातील कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेतील कार्यक्रम तसेच इतर सभा होत असतात. अनावधानाने एखाद्या नागरिक तथा विद्यार्थ्यांचा तोल जाऊन अपघात झालाच तर, ही जबाबदारी कुणाची?. असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ही विहीर गेल्या कित्येक वर्षापासून वापरात नाही. या विहिरीमुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात. अशी मागणी बोरगाववाशीयांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)