मुरमाडी येथे बालक-पालक मेळावा संपन्न

Shabd Sandesh
0
शब्दसंदेश न्यूज नेटवर्क, 
  देवरी, दि.१०

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या वतीने राज्याच्या टोकावर असलेल्या ग्राम मुरमाडी येथे बाल विकासात पालकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शुक्रवारी दि.६ डिसेंबर २०२४ बालक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी कीर्तीकुमार पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी सिंगनजुडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल पटले उपस्थित होते. या मेळाव्यात सेवकांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावून पालकांना मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी सिंगनजुडे यांनी युवा पिढी निर्माण करण्यात आजचे सुदृढ बालक किती महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या राष्ट्र उभारण्यास किती मोठा हातभार असतो हे अधोरेखित केले. तसेच पालकांना बालविकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आव्हान केले. कीर्तीकुमार पटले यांनी बालकांचा त्रिकोणी सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सभोवताली असलेल्या परिस्थिती व वातावरणाचा कसा वापर करून घेणे गरजेचे आहे हे सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)