सिमेंट रस्ता देताहे अपघाताला आमंत्रण

Shabd Sandesh
0
रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याची होत आहे संबंधित कंत्राटदाराला गावकऱ्याची मागणी
           सडक अर्जुनी, दि.१७
   सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी/ख. ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते नवीन टोली, राष्ट्रीय महामार्ग ते झाशीनगर पर्यंतच्या सिमेंट रोड व डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूला मुरूम न टाकल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
    देवरी प्रकल्प आदिवासी विकास विभाग गोंदिया अंतर्गत ठक्कर बाबा योजनेचे सिमेंट रोडचे काम करण्यात आले. पण संबंधित कंत्राटदारानी सिमेंट रोडच्या व डांबरीकरणाच्या बाजूला मुरूम न टाकल्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात काही गावात मुरूम न टाकताच पैशाची उचल करण्यात आल्याची चर्चा आहे. तालुक्यात विविध योजना अंतर्गत डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्याचे कामे करण्यात आली. मात्र कंत्राटदाराच्या अनागोंदी कारभाराने या कामांना गालबोट लागत आहे.बाम्हणी/ख. रस्ता सिमेंट करण व डांबरीकरण केल्यानंतर रस्त्याच्या कडेला कंत्राटदाराने मुरूम न टाकल्याने येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर, यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सिमेंट रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
   प्रतिक्रिया
"या कामाविषयी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला मुरूम टाकण्याची सूचना केली आहे. पण अद्यापही संबंधित कंत्राटदारानी मुरूम टाकले नाही."
      =: विलास वट्टी सरपंच बाम्हणी/ख.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)