कोहमारा नवेगाव/बांध रस्त्यावरील बकी फाटा नजिक घटना
सडक अर्जुनी, दि.१४
दि.११ नोव्हेंबर २०२४ ला वेळ सायं.७:०० वाजे दरम्यान कोहमारा नवेगाव बांध रस्त्यावरील बकी फाट्याजवळ भरधाव कार तसेच दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाल्याने गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक इसमाचे नाव धनराज सुरेश कापगते(४६) रा.वांगी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक व्यक्ती धनराज कापगते आपली मोटार सायकल क्रं. एम.एच.३५ सी.ई.५८७० घेऊन नवेगाव बांध वरून कोहमारा कडे जात असताना, समोरून येणारी भरधाव चारचाकी वाहन क्र.एम.एच.३५ ए.जी.४७४१ येथील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, दुचाकी ला धडक दिली.या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीच्या प्राथमिक उपचारानंतर गोंदिया येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा. गुणवंत कठाने करीत आहेत.