बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात; सुदैवाने जीवित हानी टळली

Shabd Sandesh
0
देवरी चिंचगड मुख्य मार्गावरील ग्राम अब्दुलटोला जवळील घटना
शब्दसदेश न्यूज नेटवर्क,
 देवरी, दि.३० नोव्हेंबर २०२४
        जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात घडल्याची घटना देवरी तालुक्यातील चिचगड देवरी मुख्य रस्त्यावरील ग्राम अब्दुलटोला नजिक आज दि.३९ नोव्हेंबर २०२४ रोज शनिवारला सकाळी ७:०० वाजे दरम्यान घडली आहे. परंतु, बसेस मध्ये चालक वाहक यांच्या व्यतिरिक्त एकही प्रवासी नसल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. त्यामुळे,प्रवाशांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
      काल दि.२९ नोव्हेंबर २०२२४ ला (शुक्रवारी) दुपारी १:०० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी परिसरात एसटी बस उलटल्याची घटना घडली होती. ज्यात अकरा प्रवाश्यांचा मृत्यू तर 29 प्रवाशी जखमी झाले होेते.ही शाई वाळलेलीच नाही तरी,तर आज (दि.३०) शनिवार  पहाटे ७:००  वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील देवरी शहराला लागुन असलेल्या अब्दुलटोला या ठिकानी  विद्यार्थाना ने - आन करणारी मानव विकास संस्थेची  बस क्रमांक एम.एच ४० ए.क्यू.६०५० सदरील बस ही देवरी वरून चिचगड येथे जात असताना बस चालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने  अपघाताची घटना घडली.
    सुदैवाने यात कोणीही प्रवाशी नव्हते. ज्यामुळे मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी व पोलिसांनी तात्काळ मदत केल्यामुळे वेळीच मदत झाली. अचानक घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे काही वेळ नागरीकांत गोंधळून गेले होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदरील घटना घडली. बसचे देखील या घटनेत प्रचंड नुकसान झाले आहे.नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी बस चालक व सहकारी यांची जीवित हानी टळली.  एसटी बसचे वेळेवर मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतर खाजगी वाहतुकीच्या प्रमाणात एसटी महामंडळाच्या बसचे अपघाताचे प्रमाण अधिकाधिक आहे. बस डेपोमधून निघण्या अगोदर तिचे ब्रेक व तपासणी करणे गरजेचे असते. जेणेकरून रस्त्यावर धावत असताना कुठली अपघाताची घटना घडू नये. पंरतु जिल्ह्यात सतत होत असलेल्या बसच्या अपघातामुळे प्रवाश्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्मान झाले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)