येत्या शुक्रवारला बोरगांव येथे मंडई निमित्त "ये टुरी रशिली..रशिली" चे आयोजन

Shabd Sandesh
0
    शब्दसंदेश न्यूज नेटवर्क 
देवरी, दि.२७
    
       नवयुवक नाट्य मंडळ बोरगाव/डवकी च्या वतीने दि.२९ नोव्हेंबर २०२४ ला खास मंडई निमित्ताने नवयुवक मंडळाच्या भव्य पटांगणावर "ये टुरी रशिली.. रशिली" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   सदर कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल बिसेन उपसभापती पं.स. देवरी, सह उद्घाटक संदीप भाटिया जि.प. सदस्य गोंदिया,कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र, उपाध्यक्ष अंबिकाताई बंजार सभापती पं.स.देवरी, रंगमंच पूजक सविता ताई पुराम महिला व बालकल्याण सभापती गोंदिया, तसेच कल्पनाताई वालोदे जि.प. सदस्य गोंदिया, सहरंग पूजक रमेश ताराम माजी सभापती कृ.बा.समिती देवरी, प्रवीण दहीकर तालुकाध्यक्ष भाजपा, अनुभाई शेख नगरसेवक देवरी, दीप प्रज्वलन नितेश वालोदे युवा तालुकाध्यक्ष भाजपा, महेंद्र मेश्राम प्राचार्य सिद्धार्थ हायस्कूल डवकी, तसेच दीप प्रज्वलन सुजित अग्रवाल युवा तालुका अध्यक्ष राकापा,हिरालाल भोई संदीप मोहबिया यांच्या हस्ते पार पडणार आहे.
   विशेष अतिथी म्हणून, गरिबा टेंभुरकर सरपंच शिलापूर, सीताबाई भोयर उपसरपंच, विलास चाकाटे पत्रकार,इलियाज कुरेशी, हंसराज रहिले, मुकेश खरोले पत्रकार, सुरेश साखरे पत्रकार, संदेश मेश्राम पत्रकार, राज भाटिया, अविनाश टेंभरे, आरती मेश्राम तलाठी, मनोहर राऊत सरपंच गोटाबोडी, रामदास वाघमारे पो.पा., गौरव परसगाये सरपंच डवकी, ज्ञानेश्वर भैरम सरपंच पिंडकेपार, तारू मॅडम वनरक्षक, शुभम वैद्य पोस्टमास्टर, दामोदर राऊत तसेच इतर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. तरी रसिक मंडळींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन नवयुवक नाट्य मंडळ बोरगाव च्या वतीने करण्यात आला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)