शिवशाही बस अपघातात अर्जुनी मोर.ची पोलीस शिपाई स्मिता सुर्यवंशी चा मृतांमध्ये समावेश

Shabd Sandesh
0
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चार प्रवाशी किरकोळ जखमी
   
शब्दसंदेश न्यूज 
अर्जुनी मोर. दि.२९ नोव्हेंबर २०२४
      आज सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा - गोंदिया मार्गावर डव्वा - खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एस.टी.बसच्या भिषण अपघातात 10 ते 12 प्रवासी मृतपावल्याची भिती वर्तविली जात असुन अनेक प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची घटना आज 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली.मुतकांमधे अर्जुनी मोर.येथील रहिवासी स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश असुन अर्जुनी मोर.तालुक्यातील चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज 29 नोव्हेंबर ला भंडारा एस.टी.आगाराची भंडारा- गोंदिया ही शिवशाही बस क्रं.एम.एच.09 ई.एम.1273 , लाखनी, साकोली, कोहमारा मार्गे गोंदिया जात होती.दुपारी एक वाजेच्या दरम्यान सडक/ अर्जुनी तालुक्यातील डव्वा/ खजरी गावाजवळ एका दुचाकीला वाचवितांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस पलटली.या भिषण अपघातात दहा ते पंधरा प्रवासी मृत्युपावल्याची भिती वर्तविण्यात येत असुन अनेक प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाल्याचे समजते.मृत पावलेल्या प्रवाशांमधे अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंन्सी ह्या पोलीस शिपाई महीलेचा समावेश आहे.तर तालुक्यातील ईंजोरी येथील शंकर देवाजी हुकरे,रामकला शंकर हुकरे,बोंडगांवदेवी येथील राहुल मधुकर कांबळे,सोमलपुर येथील टिना यशवंत दिघोरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहीती आहे.
     या बस अपघातात मृत्यु झालेली स्मिता सुर्यवंन्सी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते.त्यांचे  यापूर्वीच आजाराने निधन झाले होते.त्यामुळे स्मिता सुर्यवन्सी यांचेवर मोठा आघात झाला होता.आपले सासु सासरे व एका छोट्याशा बाळासह हालाकीचे.जिवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तिन महिण्यापुर्वीच नोकरी मिळाली होती.आपले परिवारांना भेटुन स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोर वरुन साकोली ला गेली.व तिथुन गोंदिया ला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बसनी जात असता हा दुर्देवी अपघात घडल्याने स्मिता चा जागीच मृत्यु झाला.या दुर्देवी घटनेने अर्जुनी मोर शहरांसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)