भरधाव कार ने, भाजीपाला विक्रेत्यास चिरडले..

Shabd Sandesh
0
चिचगड मार्गावरील फुटाणा फाट्यानजिक रुपलाल बोडीजवळील घटना
  
देवरी, दि.२५
    दि.२४ नोव्हें.२०२४ ला सायं.६:३० च्या सुमारास देवरी चिंचगड मार्गावरील फुटाना फाट्यानजीक रूपलालच्या बोडीजवळील झालेल्या अपघातात भरधाव कार ने दुचाकीवरून भाजीपालाचा व्यवसाय करणाऱ्या इसमास धडक दिली. धडक एवढी भयानक होती की, दुचाकी ही चंदामेंदा होऊन भाजीपाला विक्रेत्याला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय देवरी येथे घेऊन,पुढील उपचारासाठी गोंदिया ला रवानगी करण्यात आली. पण वाटेतच,त्याला मृत्यूने कटाळले. मृत झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव,रूपचंद कारू कोरे (वय५८) रा.पदमपुर ता. देवरी असे आहे.
   प्राप्त माहितीनुसार,मृत रूपचंद कोरे यांनी पोटाची खळगी भरण्याकरिता, शेतीला जोड व्यवसाय म्हणून, मागील सहा वर्षापासून गावाशेजारील खेड्यापाड्यात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.नित्यदिन व्यवसाय करणारा मृतक काल दि. २४ नोव्हे.२०२४ ला भाजी विक्री करून आपल्या दुचाकी क्र. एम. एच.३५ ए.क्यू.७८६० ने देवरी चिचगड मार्गावरून राहत्या घरी येत असताना, फुटाणा फाट्यानजीक रूपलाल बोडीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव येणारी कार क्र. सी.जी. ०८ ए.यु. ७४१९ ने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा होवून, भाजी विक्रेत्यास गंभीर दुखापत झाली. त्यांला प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथे रवाना करण्यात आले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहे.मृत्यु पश्चात पत्नी, तीन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)