देवरी चिंचगड मार्गावरील ग्राम अब्दुलटोला नजीक घटना...
शब्दसंदेश न्यूज
देवरी, दि.२९
देवरी तालुक्यातील मसूरभावडा येथील रहिवाशी नरेंद्र मुकेश कुंभरे (वय २२) या तरुणाचा धानाची वाहतूक करीत वापस येत असताना,ट्रॅक्टर पलटून ट्रॉली खाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूच्या गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, काल दि.२८ नोव्हेंबर २०२४ गुरुवार च्या सायं.७:०० वाजेच्या सुमारास ग्राम परसोडी वरून ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३५ ए.जी.७६२४ मध्ये धानाची पोती घेऊन ग्राम भागी येथे धान विकण्यासाठी आले. धान विकून झाल्यानंतर सदर ट्रॅक्टर घरी ग्राम मसूरभावडा येथे वापस जात असताना, देवरी चिचगड रस्त्यावरील ग्राम अब्दुलटोला नजीक रात्री ११:३० च्या सुमारास ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरून ट्रॉली पलटी झाली.यात नरेंद्र मुकेश कुंभरे यांचा ट्रॉली खाली दबून जागीच मृत्यू झाला. देवरी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेत, गुन्हा नोंदवून पुढील तपास पोहवा.ग्यानीराम करंजेकर करीत आहेत.