देवरी, दि.१७
ग्राम मुरदोली शिवारातील पोलीस ठाणे देवरी अंतर्गत घटना...
देवरी पासून ०३ कि.मी. अंतरावर असणार्या मुरदोली गावच्या हद्दीत ट्रक आणि सायलकचा भीषण अपघात झाला. नागपूर रायपूर महामार्गावर भरधाव वेगाने येणार्या ट्रकने पाठीमागून सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात रविवार (दि.१७) सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला.मृतकाचे नाव मारोती नत्थू पिहदे (वय ५८) रा.चिचेवाडा ता. देवरी असे आहे.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत मारोती पिहदे मोलमजुरी करण्याकरिता नेहमीप्रमाणे त्यांच्या ताब्यातील सायकलने रोज देवरी येथे काम करण्यासाठी रायपूर नागपूर क्रं.५३/६ महामार्गाने ये जा करीत होते. दरम्यान, मुरदोली गावच्या थांब्याजवळ आले असता, डाव्या बाजूकडील देवरी मार्गे जात असताना पाठीमागून येणार्या ट्रॅक क्र.(सी.जी.०४ पी . जी.४३१३) चालकाने पाठीमागून अतिवेगात येऊन सायकलला धडक दिली. या अपघातात मारोती पिहदे यांना गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपी ट्रॅक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बडोले करीत आहेत. मृत व्यक्तीच्या पश्चात पत्नी, तीन मुले,नातवंडे तसेच बराच आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे गावात शोकांकिता पसरलेली आहे.