गोंदिया, दि.१६
देवरी तालुक्यातील ग्राम परसटोला येथे तडीपार केलेला आरोपी आढळल्याने, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कॅप्टनपाल महेंद्रपालसिंग भाटिया (32) रा. वार्ड क्र.७ देवरी याला ३० सप्टेंबर रोजी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) (अ)(ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये देवरी आमगाव व सालेकसा या तीन तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. परंतु, हद्दपार केल्यानंतर तो देवरी तालुक्यातील ग्राम परसटोला येथे गुरुवारी (दि.१४) सायं. ५:०० वाजे दरम्यान आढळला.पोलीस शिपाई रोशनलाल ढोरे यानी त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. देवरी पोलिसांनी या घटनेसंदर्भात आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस हवालदार अनिशा पठाण करीत आहेत.