शब्दसंदेश न्यूज नेटवर्क
देवरी, दि. २९ नोव्हेंबर २०२४
■ या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.
श्री गुरूनानक देवजी जयंती निमीत्य देवरी येथील श्री गुरूसिंग सभा च्या वतीने शुक्रवारी रोजी येथील नगरपंचायतीच्या ५० च्या जवळपास सफाई कामगारांना कंबल व फळाचे वाटप केले.तसेच पूर्ण आठवड्याभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सिख बांधवांनी मोठ्या उत्साहात श्री गुरूनानक देवजी यांची जयंती साजरी केली.
देवरी येथील नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना कंबल व फळ वाटप श्री गुरूसिंग सभेचे अध्यक्ष परमजीतसिंग (जित्ते ) भाटीया, सचिव सतविन्दरसिंग भाटीया, गजेन्द्रसिंग भाटीया(बंटी), जसपालसिंग सलुजा, खालसा दलचे अध्यक्ष ऋषी भाटीया, सचिव गुरूदयालसिंग,अजीतसिंग भाटीया यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी देवरी येथील सिख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.