देवरी, दि.२४
आमगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संजय पुराम हे विजयी झाले असून त्यांनी मवीआ राजकुमार पुराम यांचा ३३०१६ मताने पराभव केला.
या निवडणुकीमध्य भाजप चे संजय पुराम यांना एक लाख १ लाख ९ हजार ३०९ तर माविआ चे उमेदवार राजकुमार पुराम यांना ७६२९३ मते मिळाली.
संजय पुराम यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
आमगाव मतदार संघामध्ये २३ फेऱ्यां होईपर्यंत मतमोजणीत आघाडीत असलेले,२३ फेऱ्या झाल्यानंतर भाजपाचे संजय पुराम हे विजयी झाल्याच्या बातम्या काही वर प्रसारित झाल्या, आणि भाजपा कार्यकर्त्यांनी संजय पुराम विजयी झाल्याच्या, पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, संजय पुराम यांच्या पुराडा निवासस्थानी ही गुलाल उधळून पेढे वाटून फटाके फोडले.