बालसुधारगृह नागपूर येथून पळून आलेल्या दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

Shabd Sandesh
0
गोंदिया शहर डि.बी. पथकाची कामगिरी
    
देवरी, दि.२५ नोव्हे.
   
        पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे मागील ३-४ महिन्यापुर्वी गोंदिया ते ढाकणी कडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वे सुन्नी चौकी येथे अवैद्य शस्त्रानिशी दरोडयाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी राहुल जसवानी रा. श्रीनगर गोंदिया यास इतर आरोपीतांसोबत ताब्यात घेवून अटक केली होती. तेव्हा त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्र. ४८०/२०२४ क. ३१०(४) भा.न्या.सं. सहकलम ४,२५ भाहका, १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद केला होता... सदर गुन्हयातील आरोपीतांसोबत दोन सोळा ते सतरा वर्षे वयोगटातील विधीसंघर्ष बालके सुध्दा होते. त्यांना सुध्दा ताब्यात घेतले होते. तेव्हापासुन ते बाल सुधारगृह नागपुर येथे आहेत. त्यापैकी एक १७ वर्ष वयोगटाचा विधीसंघर्ष बालक हा पोलीस ठाणे इमामवाडा नागपुर येथील चोरीच्या गुन्हयात बाल सुधारगृह नागपुर येथे बंद असलेल्या अन्य एका १६ वर्ष वयोगटाच्या विधीसंघर्ष बालकासोबत दि.२०/११/२०२४ रोजी पळुन गेल्याबाबत बालसुधारगृह नागपुर येथुन फोनद्वारे पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे माहिती मिळाली.... त्याअनुषंगाने पोलीस ठाणे गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक हे पेट्रोलींग करीत असताना त्यांना दि. २१/११/२०२४ रोजी बालसुधारगृह नागपुर येथुन पळुन आलेल्या गोंदिया येथील विधीसंघर्ष बालक वय १७ वर्ष हा अन्य एका मुलासोबत सुन्नी चौकी ते कुंभारेनगर गोंदिया कडे येणाऱ्या रोडवर फिरत आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पथकाने तेथे जावून दोघांना ताब्यात घेतले.. . त्या दोघांना ताब्यात घेवून विचारपुस केले असता ते दोघेही दि. २०/११/२०२४ रोजी बालसुधारगृह नागपुर येथुन गोंदिया येथे पळुन आल्याचे सांगितले... सदरबाबत पोलीस ठाणे कपील नगर नागपुर येथे गुन्हा दाखल असल्याने दोन्ही विधीसंघर्ष बालकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे,  अपर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर,  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)