संपूर्ण महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम

Shabd Sandesh
0
टिळक भवन नागपूर येथे पत्रकार परिषद संपन्न
     बहिष्कारच्या भूमिकेत कोणताही बदल करण्यात येणार नाही कृती समितीच्या आव्हान..
    
      संदेश मेश्राम, दि.१९

       गेल्या दोन दिवसापूर्वी बहिष्कार मागे घेतल्याचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या मध्ये गोंड गोवारी जमातीचा बहिष्कार हा मागे घेण्यात आला असे दाखविण्यात आले होते त्या करिता दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सोमवारला टिळक भवन नागपुर येथे गोंड गोवारी जमाती कडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि दोन दिवसापासून बहिष्कार मागे घेतल्याचा व्हिडिओ क्लिपचे खंडन पत्रकार परिषद मध्ये करण्यात आले गोंडे गोवारी जमातीचे उपोषण करते किशोर चौधरी आणि सचिन चचाने तसेच कृती समितीचे पदाधिकारी आपल्या गोंड गोवारी जमातीचा बहिष्कार हा कायम आहे करिता महाराष्ट्रातील सर्व आदिवासी गोंड गोवारी जमात बंधू भगिनी ना विनंती करण्यात येत आहे आणि कोणत्याही खोट्या नाट्या अफवांना बळी पडू नका असे आवाहन कृती समितीचे वतीने करण्यात आली असे आव्हान पत्रकार परिषदेमध्ये केले आहे
 आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कार आंदोलन बेकायदेशीरपणे मागे घेऊन निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केल्याचा व्हिडिओ क्लिप दोन दिवसापासून सोशल मीडिया वरती फिरत असल्याने त्या व्हिडिओचा खंडन करण्यासाठी नागपूर येथे आज जमातीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि ज्या साधुसंतांकडून व्हिडिओ क्लिप तयार केली होती आणि समितीच्या विरोधात जाणारे कैलास राऊत, हेमराज नेवारे, सुशील राऊत, अरुणा चचाने, सविता नेवारे, प्रतिभा बोरकर, रुक्मिणी सहारे यांना कृती समिती मधून सर्वांनु मते त्यांना बाहेर काढण्यात आले तसेच कृती समितीचे कार्यकारी संयोजक माधव कोहळे यांनी सुद्धा कृती समितीच्या ध्येयधोरणा विरुद्ध काम केल्याने त्यांना सुद्धा विकसित करण्याचा निर्णय सभेमध्ये करण्यात आला आहे 
तसेच यापुढे वरील सर्व लोक कृती समितीच्या चळवळीला जबाबदार राहणार नाही लेटरहेड वरून त्यांची नावे कमी करण्यात आली आहे तसेच बहिष्कार मागे घेतल्याचा किंवा भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर करण्याचे घोषणाशी आदिवासी गोंड गोवारी कृती समिती महाराष्ट्र राज्याचा कोणताही संबंध नाही असे आव्हान समितीने केले आहे
13 ऑक्टोंबर रोजी आमदार निवास नागपूर येथे 114 सहित बांधवांची शपथ घेऊन घोषित केलेला विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कार हा कायम राहील कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारच्या भूमिकेत कोणताही बदल करण्यात येणार नाही असेही आव्हान केले आहे
प्रतिक्रिया
"26 जानेवरी 2024 पासुन कृती समिती द्वारे आमरण उपोषण, रास्ता रोको आंदोलन, विविध मोर्चे जमातीकडून विविध मागण्यांसाठी केले आहे परंतु शासन आमच्या जमातींच्या सविधानिक मागणीकडे कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आदिवासी गोंड गोवारी कृति समिती व जमाती कडून 13 ऑक्टोंबर रोजी नागपुरच्या आमदार निवास या ठिकाणी बैटकित बहिष्कार हा एक पर्याय म्हणून म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीने शंभर टक्के बहिष्कार करण्याचा निश्चित केला होता आणि तो कायम राहील - सचिन चचाने गोंड गोवारी जमातीचे उपोषण करते" 
"जोपर्यंत आपल्याला संविधानिक मागणी न्याय मिळत नाही तोपर्यंत मतदान नाही आपल्या जमातीचा जो बहिष्कराचा निर्णय ठरलेला आहे तो ठाम राहील आणि कायम राहील आदिवासी गोंड गोवारी कृती समिती महाराष्ट्र राज्य या व्यतिरिक्त कोणत्याही संघटनेवर किंवा व्यक्तींवर आणि चुकीच्या बातम्यांवर जमातीने विश्वास ठेवू नये आपला बहिष्कारचा निर्णय कायम आहे -  किशोर चौधरी आ.गों.गो.उपोषण कर्ता"

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)